श्रीराम मंदिरासाठी 22 जानेवारीला देशभरात राष्ट्रीय सुट्टी

bpcauthor bpcauthor
1 Min Read

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) : 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे 22 जानेवारीला राष्ट्रीय सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून त्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या दोन दिवसात 22 जानेवारी हा दिवस संपूर्ण देशभरात राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करण्याच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी जोरदार तयारी सुरु आहे. २४ तास मंदिराचे काम चालू आहे.

उत्तर प्रदेशात आधीच या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील लोकांना या दिवशी दिवाळी साजरी करण्याचं आवाहन सरकारने केले आहे. जे लोकं बाहेरून अयोध्येत येणार आहे. त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी योग्य ते पाऊलं उचलण्याचे आदेश योगी सरकारने दिले आहेत.

Share This Article