प्रवासा दरम्यान ज्येष्ठ नागरिकाचे एक लाख रुपये गेले चोरीला

PCB Admin
1 Min Read

मोशी, दि. १७ (पीसीबी)- प्रवासा दरम्यान 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल एक लाख 20 हजार रुपयांची रक्कम चोरीला गेली आहे. ही घटना 11 जानेवारी रोजी मोशी ते नाशिक दरम्यान घडली आहे.

रघुनाथ हरी पाटील (वय 80 रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.16) फिर्याद दिली आहे.यावरून अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मोशी वरून नाशिक ला गेले व तेथून मोशी ला परत आले.या प्रवासा दरम्यान अज्ञात चोराने त्यांच्या बॅगेतून 1 लाख 20 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

Share This Article