कामगारांचा पीएफ जमा न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

1 Min Read

बालेवाडी, दि. ०६ (पीसीबी) – हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा पीएफ त्यांच्या पगारातून कमी केला. मात्र तो पीएफ कार्यालयात जमा न करता कामगारांची फसवणूक केली. हा प्रकार डिसेंबर 2021 ते जानेवारी 2023 या कालावधीत बालेवाडी येथील वायरोका हॉटेल्स (रमाडा) येथे घडला.

हॉटेलचे संचालक वैभव लांबा, शरद श्रीमंत यादव यांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 56 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या पगारातून 33 हजार 968 रुपये भविष्य निर्वाह निधीच्या नावाखाली कमी केले. हे पैसे आरोपींनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात कामगारांच्या नावे जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्या करता वापरले. यामध्ये आरोपींनी कामगारांचा व शासनाचा विश्वासघात करून रकमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article