किवळे येथे रोहीत्रातील ऑईल आणि तांब्याच्या तारा चोरीला

bpcauthor bpcauthor
1 Min Read

किवळे , दि. २१ (पीसीबी) – किवळे येथे तरसवस्ती मधील नाल्याशेजारी असलेल्या विद्युत रोहीत्रातून ऑईल आणि तांब्याच्या तारा चोरीला गेल्या. ही घटना सोमवारी (दि. 20) सकाळी अकरा वाजता उघडकीस आली.

महावितरण देहूरोड शाखेचे सहायक अभियंता मनोज पुरोहित यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरसवस्ती किवळे येथे नाल्याच्या शेजारी महावितरणचे विद्युत रोहित्र आहे. अज्ञात चोरट्याने रोहीत्रातून ऑईल आणि तांब्याच्या तारा एकूण 55 हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article