माजी आमदार अनिल भोसले यांना सोडविण्यासाठी १५ कोटी रुपये खंडणीची मागणी

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि. ५ (पीसीबी): राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला तोतया ईडी अधिकाऱ्याने फोन करीत १५ धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तोतया ईडी अधिकाऱ्याने भोसले यांच्या पत्नीला फोन करीत ईडीच्या गुन्ह्यातून बाहेर काढतो अशी बतावणी करीत १५ कोटींची मागणी केली.

या प्रकरणी अनिल भोसले यांची पत्नी आणि माजी नगरसेविका पत्नी रश्मी भोसले यांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अनिल भोसले यांना ईडीने शिवाजीराव भोसले बँक घोटाळ्या प्रकरणी अटक केलेली होती. रिझर्व्ह बँकेने शिवाजीराव भोसले बँकेवर कारवाईने करीत संचालक मंडळ बरखास्त कारीत प्रशासक नेमण्याचा आदेश दिला होता. बँकेच्या व्यवहारांवरही निर्बंध घालण्यात आले होते. याप्रकरणी ईडीकडून पुढील तपास सुरु आहे.

Share This Article