गुंतवणुकीच्या बहाण्याने 11 लाखांची फसवणूक

bpcauthor
1 Min Read

हिंजवडी , दि. २३ (पीसीबी) – गुंतवणुकीच्या बहाण्याने एका व्यक्तीची 11 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 15 फेब्रुवारी ते 28 एप्रिल या कालावधीत ऑनलाईन ट्रेडिंगच्या माध्यमातून घडली असून याप्रकरणी 21 ऑक्टोबर रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल विद्याधर माजगावकर (वय 37, रा. सुसगाव, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार +601128247796, +601127059182, +60116235634 या क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीस ऑनलाईन ट्रेडिंग करण्यासाठी दोन लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर गुंतवणुकीवर मिळालेला फायदा काढून घेण्यासाठी वेळोवेळी नऊ लाख रुपये घेतले. दोन लाखांचा मोबदला घेण्यासाठी नऊ लाख रुपये घेत फिर्यादीची 11 लाख रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article