नाना काटे यांच्या पाठपुराव्याने कुणाल रोड वरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात

PCB Admin
1 Min Read

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक श्री. विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी शिवार चौक ते छत्रपती युवा चौका पर्यंतचा रोडबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्या त्यानुसार काल दि. २८ जुलै रोजी सततच्या तक्रारीनुसार पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोड संबंधित मनपाच्या स्थापत्य प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या रस्त्यावरील खड्डे त्वरीत कोल्ड मिक्स पद्धतीने बुजविण्यासाठी आदेश दिले होते त्यानुसार आज कोल्ड मिक्स पद्धतीने खड्डे बुजविण्याच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली.त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना रस्त्यावरून चालणे व वाहने चालविण्यास मदत होणार आहे.

Share This Article