दुसऱ्या पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या, तर पहिल्या पत्नीची पोलिसात तक्रार

1 Min Read

चिंचवड, दि. २६ जून (पीसीबी) – दुसऱ्या पत्नीने पतीचा शारीरिक व मानसिक छळ केला म्हणून पतीने आत्महत्या केली आहे.याप्रकरणी पहिल्या पत्नीने चिंचवड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध तक्रार दिली आह. हा प्रकार जून 2022 ते 25 मे 2023 या कालावधीत चिंचवड येथील वल्हेकरवाडी येथे घडला आहे.

याप्रकरणी पहिल्या पत्नीने चिंचवड पोलीस ठाण्यात रविवारी ( दि.25)फिर्याद दिली असून पतीची दुसरी पत्नी तसेच आणखी एक महिला आरोपी व आदित्य राजगुरू सर्व राहणार चिंचवड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मयत पतीचे नाव दयानंद अरुण रावडे (वय 36 रा. वल्हेकरवाडी, चिंचवड)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती दयानंद रावडे यांनी दुसऱ्या महिलेची दुसरा विवाह करत संसार थाटला. परंतु आरोपींनी पैशाच्या कारणावरून पतीचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला, या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केली आहे. यावरून तिघांविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

Share This Article