गडचिरोलीतील भाजपच्या माजी नगरसेविकेच्या मुलीची बावधन मध्ये आत्महत्या

bpcauthor bpcauthor
1 Min Read

बावधन, दि. २० (पीसीबी) – गडचिरोलीमधील भारतीय जनता पक्षाचे नेते वासुदेव बट्टे आणि माजी नगरसेविका वर्षा वासुदेव बट्टे यांच्या संगणक अभियंता असलेल्या मुलीने बावधन येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. १८)उघडकीस आली.

सायली वासुदेव बट्टे (वय २४, मूळ रा. झाशीनगर, गडचिरोली) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली नोकरीच्या निमित्ताने वर्षभरापासून पुण्यात राहत होती. तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळाल्यावर तिचे नातेवाईक पुण्यात आले. सायलीचा भाऊ काही दिवस पुण्यात राहत होता. तो नुकताच गडचिरोलीला परतला होता. सध्या ती एकटी राहत होती. शनिवारी तिने कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सायलीच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article