पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक, दोन पिस्तूल जप्त

PCB Admin
1 Min Read

वाकड, दि. ४ (पीसीबी) – बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी जगताप डेअरी वाकड येथे करण्यात आली.

करण गजानन चोपवाड (वय २३, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रमोद कदम यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप डेअरी येथे एकजण पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून करण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी दोन देशी बनावटीचे पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे असा ५३ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article