हसल्याच्या कारणावरून तिघांना मारहाण

PCB Admin
1 Min Read

देहू, दि. १४ (पीसीबी) – पाहून हसल्याच्या कारणावरून पाच जणांनी मिळून तिघांना मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. १२) रात्री विठ्ठलवाडी देहूगाव येथे घडली.

संतोष दादाभाऊ शिंदे, संजय दादाभाऊ शिंदे, तीन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आकाश संतू दूटे (वय २१, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश, त्यांची आई आणि भावाला संजय शिंदे याने फोन करून सर्व धर्म समभाव मंडळाच्या समोरील मोकळ्या जागेत बोलावून घेतले. आकाश हे संतोष शिंदे याच्याकडे पाहून का हसले, असा जाब विचारत त्यांना मारहाण केली. एका महिलेने आकाश यांची आई आणि मित्राला लाकडी दांडक्याने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article