अल्पवयीन मुलीसोबत वृद्धाने केले गैरवर्तन

PCB Admin
1 Min Read

चिखली, दि. १४ (पीसीबी) – अल्पवयीन मुलीसोबत ६७ वर्षीय व्यक्तीने गैरवर्तन करून विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. ११) रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या सुमारास थरमॅक्स चौक, चिंचवड येथे घडली.

तानाजी रंगनाथ भोर (वय ६७, रा. थरमॅक्स चौक, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची मुलगी त्यांच्या घराच्या परिसरात खेळत असताना तानाजी याने तिथे जाऊन मुलीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article