चिंचवडची निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढविणार, प्रचार सुरु करा – अजित पवार

PCB Admin
1 Min Read

पुणे, दि.३ (पीसीबी)- चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यासाठी मित्र पक्षांशी चर्चा सुरु आहे. ही राष्ट्रवादीला सुटेल. घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढविली जाईल. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पक्षाचा प्रचार सुरु करावा, अशा सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पदाधिका-यांना दिल्या.

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांना अजित पवार यांनी पुण्यातील बारामती होस्टेल येथे बोलावून घेतले होते. इच्छुक असलेले भाऊसाहेब भोईर, नाना काटे, नवनाथ जगताप, मयुर कलाटे, मोरेश्‍वर भोंडवे, प्रशांत शितोळे, माया बारणे, राजेंद्र जगताप, ॲड. गोरक्ष लोखंडे, माधव पाटील यांच्याशी अजितदादांनी वैयक्तिकरित्या चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी एकांतात आणि पुन्हा सर्वांशी एकत्र चर्चा केली.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे, चिंचवडचे निरीक्षक आणि मावळचे आमदार सुनील शेळके, पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, संजोग वाघेरे, मंगला कदम, माजी सभागृह नेते जगदीश शेट्टी आदी यावेळी उपस्थित होते.

Share This Article