राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती बिघडली, “या” रुग्णालयात दाखल

1 Min Read

मुंबई,दि.३१(पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्याकडून पत्र काढून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार पुढील तीन दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेतील.

२ नोव्हेंबरला पवार यांना डिस्चार्ज मिळेल. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करु नये, अशा सूचना पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार हे ३ नोव्हेंबर शिर्डीतील सभेला हजर राहतील. त्यानंतर ४ व ५ नोव्हेंबरला होणाऱ्या राष्ट्रावादी काँग्रेसच्या दोन दिवसीय शिबीरालाही शरद पवार उपस्थित राहतील.

Share This Article