गौतम अदानी आता मुकेश अंबानींपेक्षा श्रीमंत

1 Min Read

मुंबई, दि. २० (पीसीबी) – फोर्ब्सनं श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली असून अपेक्षेप्रमाणं गौतम अदानी यांनी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवलाय. त्यांनी मुकेश अंबानींना मागं टाकून प्रथम क्रमांक पटकावलाय.शेअर बाजारात कंपनीच्या उत्कृष्ट कामगिरीमुळं Nykaa च्या प्रमुख फाल्गुनी नायर यांनी प्रथमच या यादीत स्थान मिळवलंय. तर, दुसरीकडं स्टॉक क्रॅशमुळं पेटीएमचे विजय शेखर शर्मा हे भारतातील टॉप 100 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत.

गौतम अदानींनी पटकावलं पहिलं स्थान
शेअर्सच्या दमदार कामगिरीच्या जोरावर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार, गौतम अदानी यांची संपत्ती जवळपास दुप्पट होऊन $150 अब्ज झाली आहे. त्याच वेळी 2013 पासून देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या पदावर असलेले मुकेश अंबानी 2022 मध्ये $ 88 अब्ज संपत्तीसह मागे पडले आहेत. गेल्या वर्षी त्यांची एकूण संपत्ती $92.7 अब्ज होती. फोर्ब्सच्या यादीनुसार, देशातील 100 सर्वात श्रीमंत लोकांची एकूण संपत्ती $600 अब्जच्या जवळपास आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात $25 अब्जची वाढ झालीय.

Share This Article