ताथवडेत भर दिवसा घरफोडी

PCB Admin
1 Min Read

ताथवडे, दि. १६ (पीसीबी) – ताथवडे येथे चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एक लाख 91 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 15) सकाळी अकरा ते दुपारी चार या कालावधीत घडली.

सुभाषकुमार मोतीलाल (वय 26, रा. ताथवडे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर बंद असताना चोरट्याने त्यांच्या घरातून 82 हजार 500 रुपयांचे मंगळसूत्र, 55 हजारांची चेन, 27 हजार 500 रुपयांचे कर्णफुल, 26 हजार रोख रक्कम असा एकूण एक लाख 91 हजारांचा ऐवज चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article