उदय सामंत हल्ला प्रकरणात शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह ६ आरोपींना अटक

bpcauthor
1 Min Read

पुणे, दि. ३ (पीसीबी) – शिवसेनेतील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी मंगळवारी रात्री कात्रज चौकात हल्ला केल्याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह ६ आरोपींना पोलिसानी अटक करत आज न्यायालयामध्ये हजर केले. न्यायालयाने या सर्व आरोपींना ६ ऑगस्टपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.

शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांची काल रात्री सभा कात्रज चौकात झाली. यावेळी याच चौकातून शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत हे चार चाकी वाहनांतून जात होते. त्यावेळी काही शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत गाडीची काच फोडली. या प्रकरणी रात्री उशीरा १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर काही तासात पोलिसांनी हिंगोली संपर्क प्रमुख बबन थोरात, शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे, संभाजी थोरवे, राजेश पळसकर,सुरज लोखंडे,चंदन साळुंखे या आरोपींना अटक केली आहे. तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. सहा आरोपींना आज १२ च्या सुमारास न्यायाधीश तापडिया यांच्या समोर हजर करण्यात आले.

Share This Article