गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक

1 Min Read

सांगवी, दि. २९ (पीसीबी) – गांजा विक्री प्रकरणी भोसरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 27) रात्री दापोडी-सांगवी रोडवर शंकराच्या मंदिराजवळ करण्यात आली.

रोहन उत्तम कांबळे (वय 19, रा. दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकारणी पोलीस अंमलदार सागर जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांजा विक्रीसाठी एक तरुण दापोडी-सांगवी रोडवरील शंकराच्या मंदिराजवळ आला असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून रोहन कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 18 हजारांचा 650 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article