२० कोटी रुपये खंडणीसाठी बांधकाम व्यवसायिकाच्या मुलाचे अपहरण करुन खून केल्याचे उघड

0
345

पिंपरी, दि.१० (पीसीबी) – : पिंपरी येथील मासुळकर कॉलनीतुन बेपत्ता झालेल्या ७ वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आलेला आहे. हा नक्की काय प्रकार आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. हा अपहरण, खुनाचा प्रकार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरवातीला २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची चर्चा होती, पण आरोपी हा त्याच सोसायटी ती राहणार असल्याने गूढ वाढले आहे.

आदित्य गजानन ओगले (7, रा. ग्रीन फिल्ड सोसायटी, उद्यमनगर, मासुळकर कॉलनी, पिंपरी) असे मृतदेह आढलेल्या मुलाचे नाव आहे. आदित्य हा गुरुवारी सायंकाळी पासून बेपत्ता होता.

आदित्य बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. सर्व ठिकाणी, वेगवेगळ्या पथकाच्या सहायाने तपास केला.

शुक्रवारी रात्री उशिरा एमआयडीसी परिसरात आदित्य याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी हा नक्की काय प्रकार आहे याचा शोध सुरू केला आहे.