वराळे, दि. १५ (पीसीबी) -विद्यार्थ्यांची हॉस्टेल फीस न भरता त्याचा परस्पर अपहार केल्या प्रकरणी वराळे येथील डि.वाय .पाटील महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार 18 ऑगस्ट 2023 ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत घडला.
याप्रकरणी डॉ. सुशांत विजयकुमार पाटील (वय 41 रा. बालेवाडी) यांनी बुधवारी (दि.14) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून तुषार सुंदर बापू क्षीरसागर (रा. वराळे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,, तुषार याने मावळातील वराळे येथे असणाऱ्या डी.वाय.पाटील एम.बी.ए. महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फीस हॉस्टेलच्या बँक खात्यावर न भरता त्याचा परस्पर अपहार केला. क्यूआर कोडचा वापर करून त्याद्वारे स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर केले. याबाबत विचारणा केली असता आरोरावीची भाषा करत पैसे देणार नाही असे सांगितले. यावरून आरोपीवर 2 लाख 97 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक झाली नसून तळेगाव एमआयडीसी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.














































