स्वीस बँकेत भारतीयांची रक्कम वर्षभरात तब्बल तीन पटी

0
346

झुरीच,  दि. १९ (पीसीबी)  : स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेत (स्विस बँक) भारतीय उद्योजक आणि कंपन्यांच्या ठेवींमध्ये २०२० या वर्षात प्रचंड वाढ झाली आहे. भारतीय उद्योजक आणि कंपन्यांनी केलेली रोखे आणि इतर गुंतवणूक मिळून खात्यातील मूल्य तब्बल २० हजार ७०० कोटीवर (२.५५ अब्ज स्विस फ्रॅंक) गेले आहे. वर्षभरात खात्यातील रक्कम तब्बल तीन पटीने वाढली आहे.

स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने नुकताच त्यांच्याकडील खात्यांच्या शिलकीचा तपशील जाहीर केला. ज्यात भारतीय आणि भारतीय कंपन्यांची स्विस बँकेत जी खाती आहेत त्यातील एकूण रक्कम २० हजार ७०० कोटींवर गेली आहे. २०१९ मध्ये या खात्यांमध्ये ६६२५ कोटीची रक्कम होती. तर त्याआधी दोन वर्षे त्यात घसरण झाली होती. मात्र २०२० मध्ये खात्यातील शिल्लक प्रचंड वाढली असून गेल्या १३ वर्षांत पहिल्यांदाच भारतीयांची जमा शिल्कक इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

अदानी समूहातील शेअर्सची दाणादाण ; पाच दिवसात गुंतवणूकदारांना बसला प्रचंड फटका
प्रत्यक्ष खातेदारांकडून होणाऱ्या जमा रकमेत घसरण झाली असली तरी त्यांनी गुंतवणूक केलेल्या पर्यायांमधील गुंतवणूक मूल्यात मात्र वाढ झाली आहे. भारतीयांच्या एकूण २०७०० कोटींपैकी जवळपास ५०३.९ दशलक्ष स्विस फ्रॅंक (४००० कोटी) ग्राहकांच्या ठेवी आहेत. ३८३ दशलक्ष स्विस फ्रॅंक (३१०० कोटी) इतर बँकाच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहेत. तर जवळपास २ दशलक्ष स्विस फ्रॅंक (१६.५ कोटी) ट्रस्टच्या माध्यमातून ठेवले आहेत आणि १६६४.८ दशलक्ष स्विस फ्रॅंक (१३५०० कोटी) बॉण्ड, सिक्युरिटीज आणि इतर पर्यायी गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवण्यात आले आहेत.

स्विस बँकेत भारतीयांच्या खात्यात असलेली रक्कम आणि संपत्तीला स्वित्झर्लंड सरकार काळा पैसा ग्राह्य धरत नाही. मात्र भारत सरकारला कर चोरी आणि आर्थिक घोटाळ्यात स्वित्झर्लंड सरकारकडून सहकार्य केले जाते. २०१८ पासून दोन्ही देशांमध्ये माहितीची देवाण घेणाव करण्याचा करार आहे.