“स्वातंत्र्यवीर सावरकर” हा चित्रपट म्हणजे स्वातंत्र्य संग्रामात सावरकरांचे त्याग आणि समर्पण जाणून घेण्याची एक सुवर्णसंधी – शत्रुघ्न काटे.

0
191

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन मार्फत परिसरातील नागरिकांसाठी मोफत साई चौक येथी रॉयल सिनेमा याठिकाणी “स्वातंत्र्यवीर सावरकर” या चित्रपट शो चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांनी यावेळी हजेरी लावत या चित्रपट बाबत संवाद साधला. “स्वातंत्र्यवीर सावरकर” या चित्रपटाच्या माध्यमातून सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना दाखवण्याचा प्रयत्न या एका चित्रपटातून करण्यात आले आहे.

यावेळी श्री शत्रुघ्न (बापु) काटे यांनी आलेल्या नागरिकांसोबत संवाद साधित विचार व्यक्त केले के ” या चित्रपटाचे आयोजन करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे स्वातंत्र्य संग्रामात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेला प्रवास, त्यांचे योगदान आणि अंदमानच्या काळापाणी येथे त्यांनी भोगलेला त्रास , बलिदान हे आपल्या आजच्या पिढीला कळणे फार गरजेचे आहे .आजची युवा पिढी हे जे काही स्वातंत्र्य जीवन जगत आहेत ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सावरकर आणि इतर क्रांतिकारकांनी कसे आपले जीवनाचे बलिदान दिले याची जाणीव यांना करून देणे फार गरजेचे आहे. सावरकरांचे विचार, त्यांचे संस्कार हे येणाऱ्या पिढी ना पिढीच्या मनात रुजले गेले तरच प्रत्येकात मनात सावरकर नावाची ज्योत सदैव ज्वलंत राहील.”
एका चित्रपटात मावेल इतकेच सावरकरांचे कार्य नाही परंतु भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचे घटक म्हणून विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या घटना तीन तासांमध्ये बसवणं हे अतिशय कठीण कार्य करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न दिग्दर्शक म्हणून रणदीप हुड्डा यांनी केला आहे आणि प्रेक्षकांनाही ते आवडीस पडल्याचे दिसून येत आहे.
एकूणच सावरकरांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाबद्दल माहिती हवी असेल तर आणि विनायक दामोदर सावरकर हे व्यक्तिमत्व जाणून घ्यायचे असेल तर हा चित्रपट सर्वानी आवर्जून बघितला पाहिजे असे आवाहन शत्रुघ्न (बापु) काटे यांनी केले आहे.
यावेळी श्रीरंग (आप्पा) बारणे,श्री शत्रुघ्न (बापु) काटे,श्री मोरेश्वर शेडगे,श्री विकास सक्सेना,श्री कैलास कुंजीर,श्री विनोद पाटील , श्री राजेश पाटील,सौ.सुप्रिया पाटील,श्री दीपक गांगुर्डे,श्री समीर देवरे,श्री संदीप फुके,श्री राजू शेलार,श्री शिवराज काटे व शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.