स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेचे आयोजन

0
355

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेचे 1 ते 5 मे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे दरवर्षी या व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. यंदाचे हे व्याख्यानमालेचे 39 वे वर्ष आहे. या व्याख्यानमालेमुळे तज्ज्ञ व अभ्यासू व्यक्तींचे विचार ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळते.

ही व्याख्यानमाला येत्या सोमवार (दि.1 मे) पासून निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन येथे सुरु होणार असून ५ मे पर्यंत दररोज सायंकाळी 7 वाजता व्याख्यानांना सुरुवात होणार आहे.

सोमवारपासून सुरु होणाऱ्या या व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी “अमृतकाळातील जनजातीय समाजाचे योगदान” या विषयावर क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे हे त्यांचे विचार मांडणार आहेत, तर दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.2) “आजच्या परिस्थीतीत स्वातंत्र्यवीर सावरकर समजून घेताना” या विषयावर लेखक, वक्ते व सिने अभिनेते योगेश सोमण हे विचार मांडणार आहेत. बुधवारी (दि.3) “भारतीय मानस – संभ्रमातून सत्याकडे” या विषयावर प्रसिद्ध लेखक व्याख्याते रवींद्र (राजाभाऊ) मुळे हे तिसरे व्याख्यान पुष्प गुंफणार आहेत. चौथ्या व्याख्यानाच्या दिवशी गुरुवारी (दि.4) ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ हे “हिंदू समाज की आज की चुनौतियाँ” या विषयावर त्यांचे विचार मांडणार आहेत. शेवटच्या व्याख्यानात शुक्रवारी (दि.5) “सामाजिक न्याय की भारतीय अवधारणा” या विषयावर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते, प्रा.डॉ.गुरु प्रकाश पासवान हे त्यांचे विचार मांडणार आहेत. या व्याख्यानमालेत प्रवेश नि:शुल्क असून श्रोत्यांनी कृपया वेळेच्या दहा मिनिटे आधी उपस्थित रहावे असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे करण्यात आले आहे.