स्वयंघोषित भाईने फेरीवाल्यास लुटले

0
260

काळेवाडी, दि. २२ (पीसीबी) – मिक्सर दुरुस्तीचे काम करणाऱ्या फेरीवाल्यास एका स्वयंघोषित भाईने अडवले. माझ्या एरियात काम करायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी देत भाईने फेरीवाल्यास लुटले. ही घटना सोमवारी (दि. १९) सायंकाळी साडेचार ते साडेसहा वाजताच्या कालावधीत काळेवाडी येथे घडली.

अरविंद कुमार रामजीयावन त्रिपाठी (वय ३०, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २१) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पवन जाधव आणि इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फेरीवाला म्हणून मिक्सर दुरुस्तीचे काम करतात. काळेवाडी येथे मिक्सर दुरुस्तीचे काम करत फिरत असताना आरोपींनी फिर्यादीस अडवले. माझे नाव पवन जाधव आहे. मी इथला भाई आहे. माझ्या एरियामध्ये धंदा करायचे असेल तर मला हप्ता दिला पाहिजे, असे म्हणून आरोपींनी फिर्यादीत मारहाण केली. फिर्यादीकडील साडेसहा हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांचा मोबाईल घेऊन फोन पे द्वारे ठिकठिकाणी स्कॅन करून सहा हजार रुपये काढून घेतले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.