सोन्याच्या दुकानातून मॅनेजर ने चोरले 12 लाखांचे दागिने

0
147

दि ८ मे (पीसीबी ) – सोन्याच्या दुकानात मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने दुकानातून तब्ब्ल 12 लाख रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना 4 मार्च 2024 ते 7 मार्च 2024 या कालावधीत पिंपरीतील ईश्वरी ज्वेलर्स येथे घडली आहे.

याप्रकरणी महेश अशोक खेमचंदानी (वय 40 रा.पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून रामचंद्र दास उर्फ पमोद (वय 33 रा.राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या दुकानात मागील चार वर्षापासून काम करत होता. त्याने त्याच्यावरील विश्वासाचा गैरफायदा घेत फिर्यादी यांच्या दुकानातून 11 लाख 94 हजार 680 रुपयांचे 197 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम 12 हजार 800 रुपये परस्पर चोरून नेले आहेत. यावरून पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.