सोनं १२८ तर, २२१ चांदी किलो – जगन्नाथ मंदिराचा खजिना डोळे दिपविणारा

0
93

दि. १६ जुलै (पीसीबी) – ओडिशातील पुरी येथील 12व्या शतकातील जगन्नाथ मंदिराचा खजिना हा तब्बल 46 वर्षांनंतर उघडण्यात आला आहे. मौल्यवान वस्तूंच्या यादीसाठी आणि त्याच्या संरचनेच्या दुरुस्तीसाठी हा खजिना उघडण्यात आला. राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या सदस्यांनी दुपारी 12 च्या सुमारास मंदिरात प्रवेश करत धार्मिक विधी केल्यानंतर दुपारी 1.28 च्या सुमारास हा खजिना उघडला. यापूर्वी हा खजिना 1978 मध्ये उघडण्यात आला होता.

लवकरच मौल्यवान वस्तूंची यादी तयार होणार
खजिना पुन्हा उघडण्यात आला त्यावेळी उपस्थित असलेल्या 11 जणांमध्ये ओडीशा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विश्वनाथ रथ, श्री जगन्नाथ मंदिर प्रशासन (SJTA) मुख्य प्रशासक अरबिंदा पाधी, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक (ASI) डी.बी. गडानायक आणि पुरीच्या नामांकित राजा ‘गजपती महाराज’चे प्रतिनिधी यांचा समावेश होता.

ओडीशा विधानसभा निवडणुकीमध्ये देखील हा मुद्दा गाजला होता. निवडणुकी दरम्यान रत्न भंडार पुन्हा उघडणं हा मुद्दा चांगलंच गाजला होता. त्यावेळी भाजपकडून रत्न भंडाराच्या हरवलेल्या चाव्यांवरून टीका करण्यात आली होती. तसंच जिंकल्यास रत्न भंडार पुन्हा उघडण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यानुसार मंदिराचा खजिना उघडण्यात आला.

60,822 एकरहून अधिक जमीन मंदिराच्या नावावर
या रत्न भंडारमध्ये 2 कक्ष असून एक बाह्य आणि एक आतील असा आहे. बाहेरच्या चेंबरच्या 3 चाव्या होत्या, त्यापैकी एक गजपती महाराजांकडे, दुसरी SJTA कडे आणि तिसरी चावी एका सेवकाकडे होती. सध्या मंदिराच्या संवर्धनाची जबाबदारी ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे आहे.

पुरी मंदिराच्या बँकेत जमा केलेली रक्कम अंदाजे 600 कोटी आहे. मंदिराच्या भंडाऱ्यात ठेवलेल्या साहित्याची आणि दागिन्यांची यादी ही दर तीन वर्षांनी केली जाते. 1926 आणि 1978 मध्ये याद्या झाल्या, पण मूल्यांकन केलं गेलं नाही. तसंच मंदिराच्या नावावर जवळपास 60,822 एकरहून अधिक जमीन आहे. 1978 साली मंदिराच्या खजिन्यात तब्बल 128.38 किलो सोन्याच्या 454 वस्तू होत्या.तसंच 221.53 किलो चांदीच्या 293 वस्तू होत्या. आतल्या खोलीत 43.64 किलो सोन्याच्या 367 वस्तू होत्या.तसेच इतर साहित्य होते