सेवा विकास बँक घोटाळा – कर्ज वसुलीसाठी शिवसेना माजी नगरसेवक बंधुंचे हॉटेल जप्त.

0
480

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – सेवा विकास बँकेला बुडविणाऱ्यांमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील काही बड्या राजकीय नेत्यांचाही मोठा वाटा आहे. बँकेकडून ५० लाखांच्या पुढे ज्यांनी कर्ज घेतली आणि थकवली अशा प्रकऱणांचे विशेष लेखापरीक्षण करण्यात आले. सहनिबंधक राजेश जाधवर यांनी हा लेखापरीक्षण अहवाल सादर केला आणि त्यातील शिफारशीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई सुरू केली आहे. एकूण ४७२ कोटी रुपयांना बँक डब्यात गेल्याचे स्पष्ठ झाले. तब्बल १२४ बड्या कर्जदारांनीच सलग ३०-३५ हप्ते थकवल्याने बँक आर्थिक अडचणीत सापडली. या मोठ्या थकबाकीदारांच्या यादीत शिवसेनेचे नगरसेवक निलेश हिरामन बारणे, त्यांचे बंधू माजी नगरसेवक महेश बारणे यांचा समावेश आहे. बारणे बंधुंच्या मालकीचा पिंरगूट येथील बुनिंदा दा धाबा सुधारण्यासाठी घेतलेल्या कर्ज थकबाकीसाठी ही कारवाई कऱण्यात आली आहे.

मालमत्ता जप्ती कारवाईची नोटीस स्थानिक वर्तमान पत्रात दिली आहे. त्यात सर्व तपशिल आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ अन्वये ही कारवाई कऱण्यात आली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था विक्री व वसुली अधिकारी चंद्रप्रकाश आर. यादव यांनी ही जप्ती कारवाई केली. २ कोटी १७ लाख ७३ हजार ९११ रुपये व्याजासह वसुलीची रक्कम आहे. महेश बारणे, निलेश बारणे, संभाजी वाघेरे, हिरामन बारणे यांच्या मालकीचा हा धाबा गेली तीस वर्षांपासून प्रख्यात आहे. धाबा सुधारण्यासाठी घेतलेले कर्ज परत केले नाही म्हणून ११ फेब्रुवारी २०२० रोजी जप्ती कारवाईची नोटीस दिली होती. त्यानंतरही पैसे भरण्यास कसूर केल्याने अखेर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी ताबा घेण्यात आला आणि आता जप्ती कारवाई करण्यात आली आहे.
सेवा विकास बँकेच्या सर्व मोठ्या थकबाकीदारांचे धाबे दणानले आहेत. बड्या थकबाकीदारांमध्ये शहरातील अनेक मान्यवरांचा समावेश आहे या बँकेचे अध्यक्ष माजी नगरसेवक अमर मुलचंदानी हे काही काळ कोठडित होते आता त्यांना जामीन मिळाला आहे. भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे उजवे हाथ असलेल्या मुलचंदानी यांच्यावर कारवाई हा महाआघाडी सरकारने दिलेला मोठा दणका होता.
.