सिब्बल यांच्या युक्तीवादामुळे शिंदे गट अडचणीत

0
264

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – शिवसेना पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर कोणाचा अधिकार आहे? याप्रकरणी आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर महत्वाची सुनावणी झाली. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपत आहे. त्यापूर्वी ठाकरे गटाने संघटनात्मक निवडणुका घेण्याची परवानगी मागितली आहे.

याबाबत आज सुप्रीम कोर्ट महत्वाचा निर्णय देऊ शकते. तसेच शिवसेना पक्षाचे नाव चिन्हावर आज अंतिम निर्णय येईल की सुनावणी पुढे ढकलल्या जाईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी आज महत्वाचा युक्तिवाद केला. कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या घटनेची माहिती आयोगाला दिली आहे.