सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्यास अटक

0
210

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या एकास पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. १७) सकाळी सात वाजताच्या सुमारास लिंक रोड, पिंपरी येथे करण्यात आली.

विजय तुकाराम गायकवाड (वय ५०, रा. पिंपरीगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार शांताराम हांडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय गायकवाड हा लिंक रोड पिंपरी येथे सरकारी दवाखान्याच्या कंपाउंड जवळ मंगळवारी सकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास गांजा सेवन करीत होता. याबाबत माहिती मिळाल्यांनतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करून त्याला अटक केली. त्याच्याकडून गांजा आणि गांजा सेवन करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.