सहप्रवाशाचे महिलेशी गैरवर्तन

0
340

शिरगाव, दि. २२ (पीसीबी) – बसमधून प्रवास करणाऱ्या सहप्रवाशाने महिलेसोबत गैरवर्तन करत विनयभंग केला. हा प्रकार मंगळवारी (दि. २१) मध्यरात्री दीड वाजता पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्याजवळ घडला.

चंद्रकांत भिकाजी जाधव (वय ४४, रा. लिंबोनी बाग, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मंगळवारी मध्यरात्री फलटण ते मुंबई असा बसने प्रवास करीत होत्या. बस प्रवासात चंद्रकांत जाधव हा फिर्यादी यांच्या शेजारी बसला होता. बस पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने जाताना उर्से टोलनाक्याजवळ आली असता चंद्रकांत जाधव याने झोपेचे सोंग घेऊन महिलेशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.