शिवीगाळ करताना हटकले म्हणून कॅब चालकाला मारहाण

0
379
crime

दि ३० एप्रिल (पीसीबी ) – रस्त्यावर उभा राहून आरोपी हे शिवगाळ करत होते.यावेळी हटकले म्हणून कॅब चालकाला मारहाण केली आहे.ही घटना ताथवडे येथे रविवारी (दि.28) घडली आहे

आकाश साईबाबा सोनकवडे (वय23 रा.ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सागर लक्ष्मण पवार(वय 30), सहील संदीप पवार (वय 30) यांच्यवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कॅब चालक असूनंते गाडीतून जात असताना आरोपी हे रस्त्यावर शिवीगाळ करत थांबले होते. फिर्यादी नी त्यांना शिवीगाळ का करता असे हटकले म्हणून त्यांनी फिर्याडीला खाली पाडून बेदम मारहाण केली आहे. यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.