शाहूनगरमध्ये नवदुर्गांचा सन्मान.

0
383

शाहूनगर, दि. ६ (पीसीबी) – श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नऊ महिलांना “नवदुर्गा पुरस्कार”ने सन्मानित करण्यात आले.

शिवतेजनगर, पूर्णानगर, शाहूनगर, संभाजीनगर मधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांना “नवदुर्गा पुरस्कार 2022″ने सन्मानित करण्यात आले.. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट व डॉ. अंजली आवटे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

याप्रसंगी प्रवचकार धनश्री महामुलकर उपस्थित होत्या. संस्थापक अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांनी प्रास्ताविका मध्ये पुरस्कार विषयी माहिती दिली. डॉ. अंजली आवटे यांनी सामाजिक काम करीत असताना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले. प्रा. कविता आल्हाट म्हणाल्या की, सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांच्या पाठीशी समाजाने उभे राहिले पाहिजे. समाजासाठी काम करणाऱ्या महिलांनी देव, देवतांची उपासना करावी, ध्यान करावे असे धनश्री महामुलकर यांनी सांगितले.

नवदुर्गाच्या मानकरी यांना मानाचे फेटे बांधून सन्मानित करण्यात आले. त्यात पुष्पा बोत्रे (सामाजिक )ज्योती जाधव (पर्यावरण )विजया रोडे (वैद्यकीय )संगीता जोशी (विकलांग )माधुरी कटारिया (अन्नदान )मनीषा गायकवाड (पोलीस )रजनी बागुल (एड्स जनजागृती )शलाका कोंडावर (सामाजिक ) पूनम चाचर (प्राणी )तसेच दोन विशेष सन्मान धनश्री ताई महामुलकर (आधात्मिक ) मनीषा देव (धार्मिक )यांचा करण्यात आला. याप्रसंगी प्रा. हरीनारायण शेळके, ज्योती गोफणे, सारिका पवार, अंजुषा नेर्लेकर, राजु गुणवंत, अर्चना तोंदकर,अंजली देव तसेच मोठया प्रमाणावर स्वामी सेवेकरी उपस्थित होते.. कार्यकामाचे सूत्रसंचालन राजाराम सावंत यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. हरीनारायण शेळके यांनी मानले.