शाळेला पुस्तक विक्री करत असताना पुस्तक कंपनीच्या कर्मचाऱ्याने पुस्तक विक्रीत अपरातफर कंपनी ची दोन लाखांची फसवणूक केली आहे. ही घटना 31 मार्च 2023 रोजी भोसरी येथील एस.पी.जी.इंटरनॅशनल स्कूल येथे घडली आहे.
याप्रकरणी स्वरुप सरोज मुखर्जी (वय 38 रा. बावधन ) यांनी मंगळवारी (दि.16) भोसरीपोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून कय्यूम अब्दुल चौघुले (रा.रायगड) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा प्रोलियम लर्निंग सोल्यूशन प्रा.लि. या दिल्ली येथील कंपनीत काम करत होता. त्याने कंपनीमार्फत एस.पी.जी.इंटरनॅशनल स्कूल येथे 5 लाख 34 हजार 620 रुपयांच्या पुस्तकांची विक्री केली. मात्र कंपनीच्या खात्यावर संपूर्ण पैसे न पाठवता केवळ 3 लाख 36 हजार 620 रुपये देत कंपनीची 1 लाख 98 हजार रुपयांची फसणूक केली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलीस पुढील तपास करत आहेत.









































