शहरात गाडीवर आमदार लोगो लावणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा

0
781

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शहरातील नागरिकांना आणि आम्हा विद्यार्थ्यांना खरे आमदार कोण हे ओळखणे अवघड जात आहे. गाडीवर आमदार असे स्टिकर आणि काळ्या काचा लावून शेकडो गाड्या पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या थाटात फिरत आहेत परंतु त्यांचेवर कारवाई होताना दिसत नाही. अशा वाहन मालकांवर त्वरीत फौजदारी कारवाई करा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे रविराज काळे यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात असणारे लोकसभा सदस्य,राज्यसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, विधानसभा सदस्य यांच्या अधिकृत वाहनांचे नंबर पिंपरी चिंचवड करांसाठी जाहिर करावेत. जेणेकरून खऱ्या आमदार महोदयांची गाडी ओळखणे सोपे होईल. ज्या खोट्या आमदारांनी गाडीवर अनधिकृत स्टिकर लावले गेले आहे अशांवर दंडात्मक कारवाई आणि फौजदारी गुन्हे दाखल करावेत.या पत्रांच्या अनुषंगाने किती गाड्यांवर कारवाई करण्यात आली हे लेखी पत्राद्वारे कळवावे .अशी विनंती आम आदमी पार्टीचे सदस्य रविराज काळे यांनी केली आहे.