शरद पवार… वय ८४ आणि प्रचारसभा सुध्दा ८४

0
147

लोकसभेच्या आखाड्यात सगळे नेते प्रचारात व्यग्र आहेत. विरोधकांकडून शरद पवार हे किती प्रचार करतील यावर विरोधकांकडून टीका केली जात होती. शरद पवार यांच्या वयाचा मुद्द्यावर अजित पवार यांनी देखील टीका केली होती. मात्र, २२ दिवसांत शरद पवार हे ५० सभा घेणार आहेत. तर, लोकसभा निवडणुकीच्या घोषनेनंतरचा विचार केला तर शरद पवार हे २० मे पर्यंत ८४ पेक्षा अधिक सभा घेतील, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

‘वय ८४ सभा ८४. नादच करायचा नाही. शरद पवार व्यक्ती नाही विचार आहे’ असे ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. जे कोणी बोलत आहे शरद पवारांना स्वतःला बारामती पुरेत बांधून घ्यावे लागेल. त्यांचे वय आहे 84. ते वर्धात सभा घेतली. त्यांनी विदर्भात तीन सभा घेतल्या. 20 मे पर्यंत त्यांच्या 84 सभा झाल्या असतील. आत्ताच त्यांच्या 25 सभा झाल्या आहेत, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

‘शरद पवार यांच्या क्षमते विषयी कोणी बोलू नये. त्यांच्या वया विषयी कोणी बोलू नये. त्यांनी स्वःताचे उदाहरण घालून दिले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी हा माणूस महाराष्ट्रासाठी, पुरोगामित्व टिकवण्यासाठी जे करतो आहे. त्याची आठवण युगेनयुगे काढली जाईल. या वयात लोकांना भोवळ येते, थकवा येतो पण शरद पवारांना कधीच थकवा येताना पाहिला नाही’, असे देखील आव्हाड म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांनी देखील अनेकदा जाहीर भाषाणामध्ये त्यांच्या वयाचा उल्लेख करणाऱ्यांचे कान टोचले आहेत. अजुन लय जणांना घरी पाठवायचे आहे, असे म्हणत त्यांना वयावरून बोलणाऱ्यांना त्यांनी सडेतोड उत्तर देखील दिले आहे. अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते.