शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

0
333

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कालच पवारांचा वाढदिवस झाला, त्यानंतर लगेचच हा फोन आल्याने खळबळ माजली आहे.

अज्ञात व्यक्तीने शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक निवासस्थानी फोन करून पवारांना देशी कट्ट्याने ठार मारू अशी धमकी दिली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

काल शरद पवार यांचा वाढदिवस झाला. त्यानंतर लगेचच ही धमकी आल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. फोन करणाऱी व्यक्ती हिंदीतून बोलत होती. त्या व्यक्तीचा तपास सध्या पोलीस करत आहेत.