देहूरोड, दि. ३ (पीसीबी) – देहूरोड पोलिसांनी व्यापाऱ्याचे 20 लाख रुपये चोरणाऱ्या आरोपीला दोन शस्त्रासह अटक केली आहे. हि कारवाई पोलिसांनी देहुरोड येथील साईनगर परिसरात केली आहे. ऋषिकेश उर्फ शेऱ्या राजू अडागळे असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दोन वर्षापुर्वी एका व्यापाऱ्याचे दौंड येथे 20 लाख रुपये चोरले होते. आरोपीवर देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की, देहुरोड येथील साईनगर येथे पाण्याच्या टाकीजवळ एक जण हातात तलवार घेऊन फिरत आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासीपथकाच्या दोन टिम तयार केल्या व घटनासथळी जात आरोपीचा शोध घेतला असता एक जण संशयित रित्या पळून जाताना दिसला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असात त्याच्याकडे तलवार व कंबरेला कोयता अशी दोन शस्त्रे जप्त करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांना दौंड येथील 20 लाख रुपयांची चौरी व देहुरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयांची उकल करण्यात आली.
हि कारवाई देहुरोड पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे, योगेश गायकवाड, पोलीस हवालदार प्रशांत पवार, सामिल प्रकाश, पोलीस नाईक सुनिल यादव, पोलीस शिपाई सचिन शेवाळ, पोलीस शिपाई स्वप्नील साबळे, मोशिन अत्तार, किशोर परदेशी यांनी केली आहे.