व्याजाच्या पैशांवरून तरुणाचे अपहरण

0
666

चिखली, दि. १८ (पीसीबी) – व्याजाच्या पैशांच्या कारणावरून पूर्णानगर चिखली मधून भर दिवसा तरुणाचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडे एक लाख ४० हजार रुपयांची खंडणी मागितली. एका तासात पैसे दिले नाही तर मुलाचे तुकडे करण्याची आरोपींनी धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. १६) दुपारी चार वाजता घडली.

गौतम आणि त्याच्या तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अपहरण झालेल्या तरुणाच्या वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा आणि फिर्यादीच्या साडूचा मुलगा असे दोघेजण गुरुवारी दुपारी चार वाजता दुकानावर जात होते. त्यावेळी पूर्णानगर चिखली येथील नक्षत्र सोसायटीच्या पाठीमागील रस्त्यावरून दोन कारमधून आलेल्या आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाचे अपहरण केले. मुलाने आरोपींकडून ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. ते पैसे आरोपीला परत केले नाहीत. यावरून आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाचे अपहरण केले. त्यानंतर फिर्यादी यांना फोन करून आरोपींनी ‘तुम्ही एका तासात एक लाख ४० हजार रुपये घेऊन अजंठानगर येथे आला नाही तर तुमच्या मुलाचे तुकडे करेन अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.