विश्वशांती कॉलनी येथील अनेक वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात

0
230

पिंपळे सौदागर, दि. ३० (पीसीबी) – पिपंळे सौदागर येथील विश्वशाती कॅालनी नं ६ येथील रस्त्याचे काम अनेक दिवसापासुन रखडलेले होते. कॅालनी मधील नागरिकांना चालताना व वाहतुक करताना अनेक समस्येला सामोरे जावे लागत होते, याची तक्रार नागरिकांनी मा. विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका सौ. शितलताई नाना काटे यांच्याकडे करत होते. या तक्रारीची दखल घेत महापालिका स्थापत्य विभागाला सांगुन येथे लवकरात लवकर डांबरीकरण करण्यात यावे अशा सुचना करण्यात आल्या होत्या त्यानुसार आज विश्वशाती कॅालनी नं ६ मधील रस्त्याचे डांबरीकरण करणाच्या कामास सुरूवात करण्यात आली.