वाल्हेकरवाडीत दिवसभर साखळी उपोषण

0
442

वाल्हेकरवाडी, दि. ३१ (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी वाल्हेकरवाडी परिसरातील मराठा बांधवांनी दिवसभर साखळी उपोषण केले.

सकल मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे सुरू आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा म्हणून समस्त वाल्हेकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने एक दिवसीय साखळी उपोषण छत्रपती शिवाजी महाराज चौक वाल्हेकरवाडी या ठिकाणी करण्यात आले.
उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी परिसरातील नागरिकांचाही मोठा प्रतिसाद होता. सरकारने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन सकल मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्याची मागणी सर्वांनी केली.

मारुती भापकर, शेखर चिंचवडे, अशोक भालके, शामराव वाल्हेकर, श्रीधर वाल्हेकर, नानासाहेब मरळ, राजेंद्र चिंचवडे, निलेश मरळ, तुषार कामठे यांनी उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रत्यक्ष भेट दिली.