वर्षा संजय राऊत यांच्या कडे 7.10 कोटी रुपयांची मालमत्ता

0
368

मुंबई, दि. १ (पीसीबी): 2016 मध्ये राज्यसभेची निवडणूक लढवताना संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र दिले होते. यामध्ये त्यांनी आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे. संजय आणि त्यांची पत्नी वर्षा यांच्याकडे रोख रक्कम, बँक खात्यातील ठेवी, कार, दागिन्यांसह एकूण 2.30 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. संजय यांच्या नावावर एक रिव्हॉल्व्हर आणि एक पिस्तूल नोंदवले आहे.

याशिवाय 2004 मॉडेलची कार देखील आहे. वर्षा या संपत्तीच्या बाबतीत पती आणि खासदार संजय राऊत यांच्यापेक्षा खूप पुढे आहेत. वर्षा यांच्याकडे 22 लाखांचे दागिने आहेत. त्या कन्स्ट्रक्शन फर्ममध्येही भागीदार आहे.

पालघर आणि रायगडमधील जमिनी, मुंबईतील फ्लॅट्स आणि दुकाने रिअल इस्टेटबद्दल सांगायचे तर संजय यांच्याकडे रायगडमध्ये घर आणि काही शेतजमीन आहे. त्याचबरोबर रायगड तसेच पालघरमध्ये वर्षा यांच्या नावावर भूखंड आहे. याशिवाय अलिबाग रायगडमध्ये वर्षा यांच्या नावावर आठ भूखंड आहेत. 2010 ते 2012 या कालावधीत हे भूखंड खरेदी करण्यात आले. वर्षा यांच्या नावावर मुंबईत व्यावसायिक जमीनही आहे. वर्षा यांची मुंबईत दोन दुकाने आणि एक कार्यालय आहे. हे सर्व पॉश भागात आहेत.

संजय राऊत यांच्या नावावर मुंबईत दोन फ्लॅट आहेत, तर वर्षा यांच्या नावावरही मुंबईत दोन फ्लॅट आहेत. अशा प्रकारे, संजय राऊत यांच्याकडे एकूण 4.81 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, तर त्यांच्या पत्नीकडे 7.10 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.