लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचार पातळीने गाठला खालचा तळ!

0
326

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप-काँग्रेस नेत्यांमधे तुंबळ वाक्‌युद्ध पाहायला मिळाले असतानाच आणि समाजाच्या विविध स्तरांतून त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच, बुधवारीही राजकीय नेत्यांनी एकमेकांवर टीका करताना खालची पातळी गाठल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान मोदी यांना मंग‌ळवारी ‘दुर्योधन’ संबोधणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा यांच्यापुढे जात बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी मोदींची ‘जल्लाद’ अशी संभावना केली; तर, ‘मोदी हे आधुनिक काळातील औरंगजेब आहेत’, असा उल्लेख काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला.