राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदाला शिवसेना नेते विनायक राऊत यांनी घेतला आक्षेप

0
337

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – एकनाथ शिंदे समर्थक खासदार गटाला आणि राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे. मात्र, शिवसेना नेते विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आक्षेप घेत आम्ही तीन पत्र पाठवूनही एकतर्फी निर्णय घेण्यात आला आहे, असा आरोप करण्यात आला.

विनायक राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. १८ जुलैला रात्री साडे आठ वाजता गटनेतेपदी कोणी क्लेम केला तर आम्हाला आमचं म्हणनं मांडण्यासाठी संधी द्या. अशा पद्धतीची संधी पत्र देत केली. त्यानंतर २२ जुलैला त्यासंदर्भात भेटून पत्र दिलं. मात्र, अचानक लोकसभा पोर्टलवर जे पत्र वाचलं तेव्हा यामध्ये अध्यक्षांनी पत्राची दखल घेतली नसल्याचे समजले.

खरेतर, गटनेतेपदी निवड करण्याचा अधिकार त्या त्या पक्षप्रमुखांना असतो. त्यामुळे आम्ही जे त्यांना पत्र दिल होत त्याची दखल घेणं गरजेचं होते. परंतु आमच्या पत्राला कोणतही उत्तर न देता एकतर्फि निर्णय घेण्यात आला. शिवसेनेवर लोकसभा कार्यालयाने अन्याय केला आहे. असा आरोप करत आणि यासंदर्भात सुप्रिम कोर्टात धाव घेणार असल्याचेही राऊतांनी यावेळी सांगितले. आजतरी शिवसेना पक्ष गटनेत मीच आहे. त्यामुळे याबाबतची कायदेशीर लढाई आम्ही करणार आहोत. सर्वोच्च न्यायालयात लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आम्ही आवाहन नक्की देणार. असेही विनायक राऊत यांनी म्हटले आहे.