रावेत प्रभाग सर्वांधिक मतदारांचा तर बापुजीबुवानगर प्रभागात सर्वात कमी मतदार

0
288

पिंपरी, दि.२३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या महापालिका निवडणूक शाखेने प्रसिद्ध केल्या असून प्रभाग क्रमांक 24 मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेतमध्ये सर्वाधिक 51 हजार 989 मतदार आहेत. तर, सर्वात कमी थेरगावतील प्रभाग क्रमांक 34 बापुजीबुवानगर, ज्ञानेश्वर कॉलनीत 22 हजार 412 मतदार आहेत.  

प्रारूप मतदार यादीवर आलेल्या सुमारे साडे आठ हजारांवर हरकतींच्या अनुषंगाने सुमारे 84000 हजार मतदारांच्या प्रभागांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्याची टक्केवारी 5.50 टक्के आहे. महापालिका निवडणुकीला 14 लाख 88 हजार 129 मतदारांची संख्या  आहे. त्यात पुरुष 8 लाख 384, महिला 6 लाख 87 हजार 642 आणि इतर 88 मतदार आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 5 लाख 86 हजार 849 , भोसरी विधानसभा मतदारसंघात 5 लाख 27 हजार 799, पिंपरी विधानसभेत 3 लाख 76 हजार 470 आणि भोर विधानसभा मतदारसंघातील ताथवडेगावात 9 हजार 575 मतदार आहेत.

अशी आहे प्रभागनिहाय मतदारसंख्या!
1) तळवडे रुपीनगरमध्ये 19 हजार 962 पुरुष तर 15 हजार 45 महिला आणि 15 इतर असे एकूण 35 हजार 22 मतदार आहेत.
2) चिखलीगावठाण प्रभागात 18 हजार 138 पुरुष, 14 हजार 883 महिला तर इतर 3 असे एकूण 33 हजार 24 मतदार आहेत.
3) बो-हाडेवाडी, जाधववाडीत 25 हजार 286 पुरुष, 20 हजार 663 महिला, इतर 2 असे एकूण 45 हजार 951 मतदार आहेत.
4) मोशीगावठाण, डुडुळगावमध्ये 12 हजार 930 पुरुष, 10 हजार 850 महिला, इतर 2 असे 23 हजार 782 मतदार आहेत.
5) च-होली, चोविसावाडीत 18 हजार 830 पुरुष, 16 हजार 497 महिला, इतर 5 असे 35 हजार 362 मतदार आहेत.
6) दिघी, बोपखेलमध्ये 19 हजार 270 पुरुष, 16 हजार 763 महिला, इतर 1 असे 36 हजार 34 मतदार आहेत.
7) सँण्डविक कॉलनी, रामनगरमध्ये 14 हजार 78 पुरुष तर 11 हजार 404 महिला असे 25 हजार 482 मतदार आहेत.
8) भोसरी गावठाण, गवळीनगरमध्ये 19 हजार 105 पुरुष तर 15 हजार 280 महिला असे 34 हजार 385 मतदार आहेत.
9) धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहत प्रभागात 18 हजार 847 पुरुष, 13 हजार 711 महिला, इतर 3 असे 32 हजार 561 मतदार आहेत.
10) इंद्रायणीनगर, लांडेवाडी प्रभागात 17 हजार 401 पुरुष, 13 हजार 372 महिला, इतर 1 असे 30 हजार 774 मतदार आहेत.
11) गवळीमाथा, बालाजीनगरमध्ये 15 हजार 93 पुरुष, 12 हजार 496 महिला असे 27 हजार 589 मतदार आहेत.
12) घरकुल, नेवाळे, हरगुडे वस्तीत 16 हजार 616 पुरुष, 12 हजार 242 महिला, इतर 2 असे 28 हजार 860 मतदार आहेत.
13) मोरेवस्ती, म्हेत्रेवस्तीत 17 हजार 161 पुरुष, 13 हजार 365 महिला, इतर 2 असे 30 हजार 528 मतदार आहेत.
14) यमुनानगर, फुलेनगर प्रभागात 15 हजार 826 पुरुष, 13 हजार 564 महिला, इतर 1 असे 29 हजार 391 मतदार आहेत.
15) संभाजीनगर, पूर्णानगर, शाहूनगरमध्ये 16 हजार 830 पुरुष तर 15 हजार 137 महिला असे 31 हजार 967 मतदार आहेत.
16) नेहरुनगर, विठ्ठलनगर, यशवंतनगरमध्ये 15 हजार 183 पुरुष, 13 हजार 352 महिला, इतर 2 असे 28 हजार 537 मतदार आहेत.
17) वल्लभनगर, एच.ए.कॉलनी, संत तुकारामनगरमध्ये 13 हजार 504 पुरुष तर 11 हजार 803 महिला असे 25 हजार 310 मतदार आहेत.
18) मोरवाडी, एम्पायर इस्टेट, खराळवाडी, अजमेरात 19 हजार 817 पुरुष, 17 हजार 843 महिला, इतर 1 असे 37 हजार 661 मतदार आहेत.
19) चिंचवड स्टेशन, दत्तनगर, मोहननगर, आनंदनगरमध्ये 15 हजार 525 पुरुष तर  13 हजार 713 महिला असे 29 हजार 238 मतदार आहेत.
20) काळभोरनगर, विद्यानगर, रामनगर, अजंठानगरमध्ये 18 हजार 336 पुरुष, 14 हजार 905 महिला, इतर 1 असे 33 हजार 242 मतदार आहेत.
21) आकुर्डीगावठाण, गंगानगर, दत्तवाडीत 18 हजार 815 पुरुष, 16 हजार 306 महिला, इतर 2 असे 35 हजार 132 मतदार आहेत.
22) ओटास्कीम, निगडी गावठाण, साईनाथनगरमध्ये 15 हजार 568 पुरुष तर 14 हजार 69 महिला असे 29 हजार 637 मतदार आहेत.
23) वाहतूकनगरी, भक्ती-शक्ती, केंद्रीय वसाहतमध्ये 17 हजार 711 पुरुष, 16 हजार 707 महिला, इतर 1 असे 34 हजार 419 मतदार आहेत.
24)  मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेतमध्ये 27 हजार 341 पुरुष, 24 हजार 645 महिला, इतर 3 असे 51 हजार 989 मतदार आहेत. सर्वाधिक मतदारसंख्या या प्रभागात आहे.  
25) वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, शिंदेवस्तीत 12 हजार 751 पुरुष, 10 हजार 699 महिला इतर 5 असे 23 हजार 455 मतदार आहेत.  
26) बिजलीनगर, दळवीनगर, भोईरनगरमध्ये 17 हजार 771 पुरुष, 15 हजार 784 महिला, इतर 4 असे 33 हजार 519 मतदार आहेत.  
27) चिंचवडगाव, उद्योगनगर, प्रेमलोक पार्कमध्ये 17 हजार 981 पुरुष, 16 हजार 738 महिला, इतर 1 असे 34 हजार 720 मतदार आहेत.  
28) केशनगर, यशोपुरम,श्रीधरनगरमध्ये 18 हजार 520 पुरुष, 17 हजार 285 महिला, इतर 1 असे 35 हजार 806 मतदार आहेत.  
29) भाटनगर, मिलिंदनगर, पिंपरी कॅम्पमध्ये 19 हजार 25 पुरुष, 17 हजार 296 महिला, इतर 2 असे 36 हजार 332 मतदार आहेत.  
30) पिंपरीगाव, अशोक थिएटर, वैभनगरमध्ये 18 हजार 531 पुरुष, 17 हजार 249 महिला, इतर 2 असे 35 हजार 782 मतदार आहेत.  
31) काळेवाडी, विजयनगर, नढेनगरमध्ये 16 हजार 267 पुरुष, 13 हजार 870 महिला, इतर 1 असे 30 हजार 138 मतदार आहेत.  
32) तापकीरनगर, रहाटणी, ज्योतिबानगरमध्ये 14 हजार 51 पुरुष तर 12 हजार 24 महिला असे 26 हजार 75 मतदार आहेत.  
33) रहाटणी, रामनगर, शिवतिर्थनगरमध्ये 13 हजार 663 पुरुष तर 11 हजार 747 महिला असे 25 हजार 410 मतदार आहेत.  
34) बापुजीबुवानगर, ज्ञानेश्वर कॉलनीत 12 हजार 172 पुरुष तर 10 हजार 240 महिला असे 22 हजार 412 मतदार आहेत. हा सर्वात कमी मतदारसंख्येचा प्रभाग आहे.  
35) थेरगाव, बेलठिकानगर, पवारनगरमध्ये 13 हजार 315 पुरुष, 11 हजार 46 महिला, इतर 2 असे 24 हजार 363 मतदार आहेत.  
36) गणेशनगर, संतोषनगर, पद्मजीपेपर मिल प्रभागात 16 हजार 512 पुरुष, 13 हजार 936 महिला, इतर 2 असे 30 हजार 450 मतदार आहेत.  
37) ताथवडे, पुनावळे, काळाखडकमध्ये पुरुष 13 हजार 881 तर 10 हजार 874 महिला असे 24 हजार 755 मतदार आहेत.  
38) वाकड, भुमकर, कस्पटे, वाकडकरवस्तीत 24 हजार 63 पुरुष, 19 हजार 677 महिला, इतर 3 असे 43 हजार 734  मतदार आहेत.  
39) पिंपळेनिलख, विशालनगर, वेणुनगर, पोलीस लाईनमध्ये 19 हजार 66 पुरुष, 16 हजार 793 महिला, इतर 9 असे 35 हजार 868 मतदार आहेत.  
40) पिंपळेसौदागर, कुणाल आयकॉन, प्लॅनेट मिलेनियममध्ये 21 हजार 969 पुरुष तर 18 हजार 982 महिला असे 40 हजार 951 मतदार आहेत.
41) पिंपळेगुरव गावठाण, जवळकरनगर, वैद्युवस्तीत 16 हजार 859 पुरुष, 15 हजार 332 महिला, इतर 2 असे 32 हजार 193 मतदार आहेत.  
42) कासारवाडी, फुगेवाडीत 16 हजार 757 पुरुष तर 14 हजार 918 महिला असे 31 हजार 675 मतदार आहेत.  
43) दापोडी, गणेशनगर, महात्मा फुलेनगरमध्ये 20 हजार 87 पुरुष, 18 हजार 577 महिला, इतर 5 असे 38 हजार 669 मतदार आहेत.  
44) पिंपळेगुरव, काशिदनगर, मोरया पार्कमध्ये 14 हजार 89 पुरुष, 12 हजार 977 महिला, इतर 1 असे 27 हजार 67 मतदार आहेत.  
45) नवी सांगवी, किर्तीनगर, विनायकनगरमध्ये 15 हजार 809 पुरुष, 14 हजार 181 महिला, इतर 1 असे 29 हजार 991 मतदार आहेत.  
46) जुनी सांगवी, ममतानगर, शितोळेनगर या चारसदस्यीय प्रभागात 20 हजार 42 पुरुष आणि 18 हजार 799 महिला असे 38 हजार 841 मतदार आहेत.  एकूण पुरुष मतदार 8 लाख 384, महिला मतदार 6 लाख 87 हजार 642, इतर 88 असे 14 लाख 88 हजार 114 मतदार आहेत.