पुणे, दि. ३१ (पीसीबी): राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, मराठ्यांना आरक्षण द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी आरक्षणावर चर्चा झाली. बाकी दुसरी काही झाली नाही. आपण त्यांना स्पष्ट सांगितलं की , नोंदीनुसार आरक्षण घ्यायला तयार नाही. समितीचा प्राथमिक अहवाल स्वीकारून महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट अधिवेश देण्याचा निर्णय घ्या. विशेष अधिवेशन बोलवा. अर्धवट आरक्षण घेणार नाही. ते तुम्ही देऊ नका. स्पष्ट शब्दात सांगितलं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आम्ही आमच्या अभ्यासकांची १२ ते १ वाजता बैठक बोलावली. वकिलांशी चर्चा करणार आहोत. पण ८३ क्रमांकावर ओबीसीतील जाती मराठा आणि कुणबी एकच असल्याचं म्हटलंय. २००४चा जीआर आहे. तो दुरुस्त करा. कारण व्यवसायावर आधारीत जाती निर्माण झाल्या आहेत. मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. त्याच धर्तीवर आरक्षण द्या. आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही. तुम्ही कितीही बहाणे सांगितलं तरी ऐकणार नाही. असं मुख्यमंत्री शिंदे यांना आम्ही स्पष्ट सांगितलं आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.