मोठी बातमी! 36 तासांपासून गायब आमदार कुठे होता? मध्यरात्री काय घडलं?

0
4

मुंबई, दि. 30 (पीसीबी) : महायुतीतून तिकीट नाकारल्याने नाराज झालेले पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल झाले होते. पण आता अखेर 36 तासांनी श्रीनिवास वनगांचा कुटुंबियांशी संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा घरी येऊन आपल्या पत्नीशी चर्चा करून पुन्हा आपल्या नातेवाईकांकडे गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे. सध्या श्रीनिवास वनगा हे बोलण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ द्यावा, अशी विनंती त्यांची पत्नी सुमन यांनी केली आहे.

श्रीनिवास वनगा हे गायब झाल्यापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. यानंतर काल मध्यरात्री तीनच्या सुमारास श्रीनिवास वनगा हे घरी परतले. त्यांनी आपल्या पत्नीशी चर्चा केली. यानंतर ते पुन्हा नातेवाईकांकडे निघून गेले. यावेळी श्रीनिवास वनगा यांनी चार पाच दिवसांनी घरी परतल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलणार असल्याचे सांगितले. श्रीनिवास वनगा हे सोमवारी रात्रीपासून नॉट रिचेबल झाले होते. गेल्या 36 तासांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. तिकीट नाकारल्याने नाराज होऊन मागील 36 तासांपासून अज्ञातवासात असलेल्या श्रीनिवास वनगा यांचा कुटुंबीयांची संपर्क झाला आहे. मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा घरी येऊन आपल्या पत्नीशी चर्चा करून पुन्हा आपल्या नातेवाईकांकडे गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे.

श्रीनिवास वनगा हे सध्या बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे ते घरी थांबले नाही. पण आणखी चार ते पाच दिवसांनी ते सुखरूप घरी परततील, अशी माहिती त्यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी दिली आहे. श्रीनिवास वनगा यांच्यासह आम्ही सध्या प्रसारमाध्यमांसमोर बोलण्याच्या मानसिकतेत नाही. आमदार श्रीनिवास वनगा यांची मनस्थिती ठीक झाल्यावर ते स्वतः प्रसारमाध्यमांसमोर येतील. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी देखील आम्हाला आत थोडी प्रायव्हसी द्यावी, अशी विनंती सुमन वनगा यांनी केली आहे.

यावेळी त्यांनी श्रीनिवास वानगा यांच्याबद्दल सविस्तर माहिती दिली. “परवा रात्रीपासून पोलिसांनी खूप शोधाशोध केली. सर्वजण खूप काळजी करत होते. मुख्यमंत्र्यांनीही फोन केला होता. यानंतर ते (श्रीनिवास वनगा) रात्री घरी आले. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आराम करत आहेत. त्यांना आराम करायचा होता, त्यामुळे ते सध्या विश्रांती घेत आहेत. त्यांनी कुठे आहेत, याची काहीही माहिती दिली नाही. पण त्यांच्यासोबत काही जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी घरी कधी येणार याबद्दल काहीही सांगितलेलं नाही”, असे सुमन वनगा यांनी म्हटले.