मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणाला मारहाण

0
333

उद्यानात मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणाला तिघांनी मिळून बेदम मारहाण केली. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 5 मे रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता साई उद्यान, चिंचवड येथे घडली.

निलेश गोविंद बागडे (वय 21, रा. साने चौक, चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतिश गायकवाड आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश हे त्यांच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत साई उद्यानात बसले होते. त्यावेळी पाठीमागून आरोपी तिघेजण आले. त्यांनी फिर्यादीस लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. त्यांनतर आरोपींनी शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.