मैत्रिणीशी बोलल्याने तरुणास बेदम मारहाण

0
262

काळेवाडी, दि. २ (पीसीबी) – मैत्रिणीसोबत बोलल्याच्या कारणावरून सहा जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. ३०) सकाळी एम एम स्कुल, काळेवाडी येथे घडली.

मयूर किरण पाटील (वय २०, रा. रहाटणी) असे मारहाण झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संकेत अशोक लोखंडे (वय २०), सचिन तुकाराम शिंगे (वय २३), अक्षय राजू खताळ (वय २१), ओंकार आबासाहेब पांडुळे (वय २१), भरत मुकुंदा चौधरी (वय १९, सर्व रा. रहाटणी), करण परमेश्वर गावडे (वय १९, रा. थेरगाव) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संकेत लोखंडे, फिर्यादी पाटील आणि त्यांचा मित्र शुभम चव्हाण यांची एक मैत्रीण आहे. पाटील हे त्या मैत्रिणीला बोलले या कारणावरून संकेत याने पाटील आणि चव्हाण यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्या साथीदारांना बोलावून आरोपींनी पाटील आणि चव्हाण यांना हाताने, लाथाबुक्क्याने, दगडाने मारहाण करून जखमी केले. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.