मुंबई, दि. १५ (पीसीबी) – हॅमलेज आणि आर्चीसच्या देशभरातील दुकानांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. भारतीय मानक विभागानं धाडसत्र राबवत १८ हजारांपेक्षा अधिक खेळणी जप्त केली आहेत. गेल्या २ आठवड्यांत ४४ ठिकाणी धाडी टाकत मोठी कारवाई करण्यात आली आहे.
देशभरातील मोठ्या दुकानांवर छापे टाकून १८ हजारांहून अधिक खेळणी जप्त करण्यात आली आहेत. हॅमलेज आणि आर्चीसच्या दुकानांवर धाडी टाकून खेळणी ताब्यात घेण्यात आली. हॅमलेज कंपनी उद्योगपती मुकेश अंबानींच्या मालकीची आहे. मे २०१९ मध्ये अंबानींनी हॅमलेज कंपनी खरेदी केली. लहान मुलांसाठी खेळणी तयारी करणारी जगातील सर्वात जुनी कंपनी अशी हॅमलेजची ओळख आहे.
गेल्या २ आठवड्यांत भारतीय मानक विभागानं देशभरात छापे टाकले. विभागानं एकूण ४४ ठिकाणी धाडी टाकत १८ हजारांपेक्षा अधिक खेळणी जप्त केली. भारतीय मापदंडांमध्ये न बसणाऱ्या खेळण्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात भारतीय मानक विभागानं मोठी कारवाई केली. यासोबतच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं तीन बड्या ई-कॉमर्स कंपन्यांना नोटीस बजावली आहे. त्यात ऍमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडिलचा समावेश आहे. निकृष्ट दर्जाची खेळणी विकल्याबद्दल या कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.