मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही – देवेंद्र फडणवीस

0
155

पुणे, दि. २ (पीसीबी) : गेल्या काही दिवसांपासून पुण्याचा पालकमंत्री कोण होणार याबाबत जोरदार चर्चा रंगत आहेत. याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. पुण्याचे पालकमंत्री हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार, असे बोलले जात होते. मात्र, याबाबत आज (ता.२ सप्टेंबर) त्यांनीच स्पष्टीकरणं दिलं असून मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही, असे जाहीर केले आहे.

माध्यम प्रतिनिधींना उद्देशून ते म्हणाले की, तुम्हाला मी महाराष्ट्रात नकोय का? का मला पुण्यातून लोकसभा लढवण्याबाबत बोलता,असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे. पुण्यात ई-बसेसच्या चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त ते पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. गेल्या अनेक दिवसांपासून पुण्याचा पालकमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू आहेत. मात्र त्या चर्चेला आज खुद्द फडणवीसांनीच पुर्णविराम दिला आहे. नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर फडणवीस आणि मंत्री चंद्रकात पाटील हे शिरूर येथे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना शिक्रापूरकर परिसरातील पदाधिका-यांनी गराडा घातला होता आणि काही प्रश्न चंद्रकांत पाटलांना सांगण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी पाटील यांनी तुम्ही आता पुढे व्हा अन् बोला तुमच्या पालकमंत्र्यांशी..अशी सूचना य़ेथील पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यावेळपासून फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार, अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. तीला आज फडणवीसांनी पुर्णविराम देत मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही, असे जाहीर केले आहे.

याबरोबरच गेल्या काही दिवसांपासून फडणवीसांनी आगामी लोकसभा निवडणूक ही पुण्यातून लढवावी अशा चर्चा होत होत्या. त्यातच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानेही भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून त्यांनी पुण्यातून लोकसभा लढावी, अशी मागणी केली होती.

दरम्यान, आज पुण्यात पीएमपी इलेक्ट्रीक बसेस आणि चार्जिंग स्टेशन्सच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ते पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यामांशी संवाद साधला. मी महाराष्ट्रात तुम्हाला नकोय का? मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही. या फक्त माध्यमातील चर्चा आहे. तुम्ही का मला पुण्यातून लोकसभा लढवण्याबाबत बोलता,असा सवालही त्यांनी केला. याबरोबरच मंत्री मंडळाच्या विस्तराबाबत विचारले असता, मंत्री मंडळ विस्तार लवकरच होईल, असे ते म्हणाले. तर काँग्रेस च्या मंत्र्यांची मंत्री मंडळात वर्णी लागणार का? या प्रश्नावर फडणवीसांनी मात्र मौन पाळले. तसेच, अशोक चव्हाण आणि माझी भेट झालेली नाही. आम्ही गणपती निमित्त एका कार्यक्रमाच्या ठिकाणी एकत्र आलो होतो,असेही त्यांनी स्पष्ट केले.